Betel Leaves and Honey | खाऊच्या पानावर थोडासा मध घालून खाल्ल्याने काय फायदे मिळतील!

पुढारी वृत्तसेवा

खाऊचे पान किंवा नागवेलीचे पान याचा विडा खान्याचे खूप फायदे आर्युवेदात सांगितले आहेत. सुपारी, कात न वापरता केवळ पान, चुना व मध यांचे सेवन केल्यास खूप फायदे मिळतील

या विड्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे पचनक्रिया सुधारते, पानातील पाचक गुणधर्म लाळेची निर्मिती वाढवतात, ज्यामुळे अपचन, गॅस आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते.

चुन्यामध्ये मुबलक प्रमाणात नैसर्गिक कॅल्शियम असते, जे हाडांची घनता वाढवण्यासाठी आणि दातांच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरते.

मध आणि पानातील अँटी-बॅक्टेरियल घटकांमुळे तोंडातील जंतू नष्ट होतात आणि दुर्गंधी तसेच घशातील खवखव कमी होते.

मधातील अँटीऑक्सिडंट्स आणि पानामधील पोषक घटक शरीराची प्रतिकारशक्ती वाढवून हंगामी आजारांपासून संरक्षण करतात.

कफ आणि खोकल्यापासून आराम मिळतो : पान व मध यांचा उष्ण आणि कफनाशक प्रभाव छातीतील साचलेला कफ पातळ करून खोकल्यामध्ये त्वरित आराम देतो.

मधामधील नैसर्गिक साखर आणि पानातील ताजेतवाने करणारे घटक शरीराला तात्काळ ऊर्जा देऊन थकवा दूर करतात.

मधाचे दाहक-विरोधी गुणधर्म आणि पानाचे शीतल घटक जिभेवर किंवा तोंडात येणाऱ्या फोडांना (अल्सर) लवकर बरे करण्यास मदत करतात.

चुन्यातील कॅल्शियम आणि मधातील दाहशामक घटक सांध्यांचे पोषण करून वात व सांधेदुखीमध्ये आराम देतात.