पुढारी वृत्तसेवा
हृदयविकाराच्या वाढत्या प्रमाणात 'हार्ट फेल्युअर' हा अत्यंत गंभीर टप्पा मानला जातो.
मात्र, आता आधुनिक वैद्यकीय उपचारांना भारतीय परंपरेची जोड दिल्यास हृदयविकाराच्या रुग्णांना मोठा दिलासा मिळू शकतो, असे एका नवीन संशोधनातून सिद्ध झाले आहे.
आपल्या संस्कृतीत महत्त्वाचे स्थान असलेल्या विड्याच्या पानांचा (नागवेलीची पाने) पूरक उपचार म्हणून वापर केल्यास हार्ट फेल्युअरच्या रुग्णांमध्ये सकारात्मक सुधारणा दिसून येत आहेत.
या अभ्यासात 242 रुग्णांचा समावेश केला होता. यापैकी 50 टक्के रुग्णांची अँजिओप्लास्टी झाली होती.
रुग्णांना दोन गटांत विभागण्यात आले होते.
एका गटाला औषधोपचार देण्यात आले तर दुसऱ्या गटाला औषधोपचारांसोबत विड्याची पाने, ओल्या नारळाचा गर व थोडी वेलची किंवा वाळवलेल्या विड्याच्या पानांची कॅप्सूल असा पूरक आहार 12 आठवड्यांसाठी देण्यात आला.
दुसऱ्या गटातील रुग्णांना अधिक लाभ झाल्याचे दिसून आले.
विड्याच्या पानांमध्ये बाष्पशील तेलांसह अमिनो ॲसिड, कार्बोहायड्रेट, विविध जीवनसत्त्व तसेच अँटिऑक्सिडंट व दाहशामक घटक आढळतात.