best way to take tablet: औषधाच्या गोळ्या घेण्याची योग्य पद्धत कोणती?

Anirudha Sankpal

पाण्याचे तापमान

औषधे नेहमी कोमट किंवा सामान्य तापमानाच्या पाण्यासोबत घ्यावीत, कारण यामुळे गोळी शरीरात लवकर विरघळते आणि तिचा परिणाम वेगाने होतो.

थंड पाण्याचे दुष्परिणाम

थंड पाणी पोटात औषध विरघळण्याची प्रक्रिया मंदावते आणि पोटाचे तापमान कमी करते, ज्यामुळे औषधाचे घटक नीट शोषले जात नाहीत.

इतर पेये टाळा

दूध, ज्यूस किंवा कॉफीसोबत औषधे घेऊ नयेत; दुधातील कॅल्शियम औषधाच्या घटकांमध्ये मिसळून त्याचा रक्तातील प्रवेश रोखू शकते.

साधे पाणी उत्तम

औषधांचा प्रभाव बदलू नये किंवा कोणताही विपरीत परिणाम होऊ नये यासाठी साधे पाणीच सर्वात सुरक्षित मानले जाते.

पीसणे किंवा चघळणे टाळा

ज्या गोळ्यांचा परिणाम हळूहळू होणे अपेक्षित असते, त्यांना कधीही चघळू किंवा कुस्करू नये.

धोका

औषध कुस्करल्यास त्याचे सर्व सक्रिय घटक एकाच वेळी शरीरात जाऊ शकतात, जे आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकते.

शोषणाची प्रक्रिया

औषधे पोट आणि आतड्यांतील पेशींद्वारे शरीरात शोषली जातात, त्यासाठी पोटातील तापमान योग्य असणे गरजेचे असते.

डॉक्टरांचा सल्ला

औषध घेताना नेहमी तज्ज्ञांनी किंवा डॉक्टरांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

येथे क्लिक करा