Salad | जेवणाआधी की जेवणासोबत: सॅलड खाण्याची योग्य पद्धत कोणती?

अविनाश सुतार

सॅलड वजन कमी करण्यासोबत शरीराला आवश्यक पोषक तत्वे मिळवून देण्यासाठीही फायदेशीर ठरते

कच्च्या भाज्या आणि फळांमधून जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटी-ऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात शरीराला मिळतात

सॅलडमध्ये फायबरचे (तंतुमय पदार्थ) प्रमाण मोठ्या प्रमाणात असते, त्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होऊन पचनक्रिया सुरळीत राहण्यास मदत होते

सॅलड खाल्ल्याने पोट भरल्या सारखे वाटत असल्यामुळे अतिरिक्त कॅलरी खाणे टाळली जाते. परिणामी वजन कमी करण्यासाठी मदत होते

काकडी, टोमॅटो यासारख्या भाज्यामध्ये पाण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्याने शरीर हायड्रेटेड राहण्यास मदत होते

सॅलडमध्ये विविध भाज्यांचा समावेश असल्याने अँटी-ऑक्सिडंट्स शरीरला मिळते, त्यामुळे त्वचा सतेज होते, केस गळती कमी होण्यास मदत होते

सॅलडवर जास्त मीठ टाकणे टाळावे, त्याऐवजी लिंबू पिळावा, भाज्या कोमट पाण्यात मीठ टाकून स्वच्छ धुवून घ्याव्यात

सॅलड जेवणाआधी किंवा जेवणासोबत खावे. रात्री उशिरा सॅलड खाणे काही लोकांना पचनास जड जाऊ शकते

सॅलड मध्ये मेयॉनीज किंवा जास्त क्रीम वापरणे टाळावे, कारण त्यामुळे कॅलरीज वाढतात

येथे क्लिक करा