Cucumber: आयुर्वेदानुसार काकडी खाण्याची योग्य वेळ कोणती?
पुढारी वृत्तसेवा
उन्हाळ्यात असो किंवा रोजच्या आहारात, काकडी शरीराला थंडावा आणि पोषण देते. पण ती खाण्याची योग्य वेळ तुम्हाला माहीत आहे का?
काकडीत व्हिटॅमिन K, व्हिटॅमिन D, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम यांसारखी पोषक तत्वे मुबलक असतात. विशेष म्हणजे यात कॅलरी, फॅट आणि कोलेस्ट्रॉलचे प्रमाण अत्यंत कमी असते.
काकडी खाल्ल्याने त्वचेला नैसर्गिक चमक मिळते. तसेच शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी आणि पचनक्रिया सुधारण्यासाठी काकडी अत्यंत फायदेशीर ठरते.
आयुर्वेदानुसार, रात्री काकडी खाणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. काकडीचा प्रभाव 'थंड' असतो, ज्यामुळे रात्रीच्या वेळी शरीरातील 'कफ दोष' वाढण्याची शक्यता असते.
ज्यांना वारंवार सर्दी, खोकला किंवा फुफ्फुसांशी संबंधित समस्या आहेत, त्यांनी रात्री काकडी खाणे टाळावे.
काकडीत पाण्याचे प्रमाण खूप जास्त असते. रात्री उशिरा काकडी खाल्ल्याने वारंवार लघवीला जावे लागू शकते, ज्यामुळे तुमची गाढ झोप मोडू शकते.
काकडी खाण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे 'दिवसा'. दुपारी जेवणासोबत किंवा सकाळी रिकाम्या पोटी काकडी खाणे आरोग्यासाठी सर्वात जास्त लाभदायक मानले जाते.
दिवसा काकडी खाल्ल्याने शरीराचे चयापचय सुधारते. यामुळे तुम्ही दिवसभर फ्रेश राहता.