पुढारी वृत्तसेवा
आपल्यापैकी अनेकांची सकाळ ब्लैक कॉफीने होते. पण, तुम्हाला माहीत आहे का? हीच तुमची सर्वात मोठी चूक असू शकते!
मेडिकल सायन्सच्या मते, सकाळी डोळे उघडताच रिकाम्या पोटी ब्लैक कॉफी पिणे शरीरासाठी अत्यंत हानिकारक मानले जाते.
सकाळी उठल्यावर शरीरात 'कॉर्टिसोल' (Cortisol) नावाचा स्ट्रेस हार्मोन जास्त असतो, जो आपल्याला नैसर्गिकरित्या ताजेतवाने आणि अलर्ट ठेवतो.
कॉर्टिसोल लेव्हल हाय असताना कॉफी प्यायल्याने कॅफिनमुळे या हार्मोनची नैसर्गिक निर्मिती मंदावते. परिणामी, शरीर कॉफीवर अवलंबून राहू लागते.
सकाळी रिकाम्या पोटी ब्लैक कॉफी प्यायल्याने पोटाच्या समस्या उद्भवू शकतात. यामुळे हायपर ॲसिडिटी आणि पोटात जळजळ होण्याचा धोका वाढतो.
सकाळी उठल्यानंतर २ ते ३ तासांनी म्हणजेच सकाळी ९:३० ते ११:३० च्या दरम्यान कॉफी पिणे सर्वात फायदेशीर आणि सायंटिफिक मानले जाते.
दुपारच्या जेवणानंतर शरीरातील कॉर्टिसोल लेव्हल पुन्हा कमी होते आणि सुस्ती येते. अशा वेळी १ कप ब्लैक कॉफी तुमची प्रॉडक्टिव्हिटी वाढवू शकते.
जर तुम्ही जिम किंवा वर्कआऊट करत असाल, तर ३० मिनिटे आधी ब्लैक कॉफी प्या. यामुळे मेटाबॉलिझम वेगवान होतो.
योग्य वेळी घेतलेली ब्लैक कॉफी शरीरातील अतिरिक्त चरबी (Fat Burn) वेगाने कमी करण्यास आणि ऊर्जा टिकवून ठेवण्यास मदत करते.
डाएटमध्ये कोणताही मोठा बदल करण्यापूर्वी किंवा आरोग्याशी संबंधित समस्या असल्यास तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.