घरात ही रोपे लावली तर तुम्ही आजारी नाही पडणार, पाहा कोणती...

पुढारी वृत्तसेवा

जर तुम्हाला वाटत असेल की घराचे वातावरण ताजे, स्वच्छ आणि निरोगी राहावे तर ही रोपे तुमच्यासाठी महत्‍वाची आहेत. ही स्वच्छ हवेसोबत घरात सकारात्‍मकता वाढवतात.

लवेंडर

लवेंडरचा सुगंध तणाव कमी करतो. चांगली झोप येण्यास मदत करते. याच्या अँन्टी बॅक्टेरिअल गुणधर्मामुळे घरातील किटक पळून जातात.

स्नेक प्लांट

हे रोपटे रात्रीही ऑक्सिजन सोडते. तसेच हवेतून टॉक्सिन्स कमी करण्यास मदत करते. कमी प्रकाशातही सहज वाढते.

कोरफड

कोरफड अनेक औषधी गुणधर्मांनी भरलेली आहे. किरकोळ भाजने, चिरण्यापासून त्‍वचा समस्यांमध्ये उपयोगी पडते. तसेच हवेलाही शुद्ध ठेवते.

स्पाइडर प्लांट

हे रोपटे हवेतील हानिकारक तत्‍वांना कमी करते. शिवाय कमी देखभालीतही चांगली वाढ होते.

गवती चहा

गवती चहाचे रोपटे कमी देखभालीतही चांगले वाढते. सर्दी, खोकला यासारख्या समस्यांमध्ये उपयोगी आहे. चहामध्ये याची पाने टाकून उकळल्यास चहाचा स्वाद आणि गुणधर्म वाढतो.

ही सर्व माहिती वाचकांपर्यंत पोहोचविणे इतकाच हेतू आहे. आरोग्याच्या समस्यांमध्ये तज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे.