Tomato benefits: टोमॅटो खाण्याचे 'हे' ५ फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

पुढारी वृत्तसेवा

लाल रंग हा सहसा धोक्याची निशाणी मानला जातो, पण आरोग्याच्या बाबतीत मात्र 'लाल' टोमॅटो आपल्याला अनेक आजारांच्या धोक्यापासून दूर ठेवतो.

tomato

हृदयरोगामध्ये वाढलेले कोलेस्ट्रॉल हे धोक्याचे लक्षण असते. हे कोलेस्ट्रॉल नैसर्गिकरीत्या नियंत्रित ठेवण्यासाठी टोमॅटो खाणे अत्यंत लाभदायक ठरते.

टोमॅटोमध्ये 'लायकोपिन' नावाचा महत्त्वाचा घटक आढळतो. संशोधनानुसार, हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी हे लायकोपिन खूप प्रभावी ठरते.

टोमॅटोमधील ऑक्सिडीकरण रोधक शरीरातील पेशी आणि गुणसूत्रांना हानी पोहोचवणाऱ्या 'फ्री रॅडिकल्स'ना रोखतात, ज्यामुळे रक्तप्रवाह सुरळीत राहतो.

रक्तात कोलेस्ट्रॉल वाढल्यास रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण होतात. टोमॅटोमधील पोषक घटक हे अडथळे दूर करून हार्ट अटॅकचा धोका कमी करण्यास मदत करतात.

फ्री रॅडिकल्समुळे कर्करोगाचा धोकाही वाढतो. टोमॅटोचे नियमित सेवन केल्यास केवळ हृदयच नाही, तर कर्करोगासारख्या गंभीर आजारांपासूनही संरक्षण मिळू शकते.

टोमॅटोमुळे शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढण्यासही मदत होते. तसेच वाढत्या प्रदूषणामुळे होणाऱ्या फुफ्फुसांच्या आजारांपासूनही टोमॅटो आपला बचाव करतो.

हृदयविकार आणि कोलेस्ट्रॉल दूर ठेवण्यासाठी आहारात टोमॅटो नक्की ठेवा.