पुढारी वृत्तसेवा
शरीराला विश्रांती मिळण्यासाठी झोप गरजेची
दिवसभराच्या कामानंतर शरीर आणि मेंदूला आराम मिळण्यासाठी पुरेशी झोप आवश्यक असते. लवकर झोपल्याने शरीर स्वतःची दुरुस्ती व्यवस्थित करू शकतं.
मेंदूची कार्यक्षमता वाढते
लवकर झोपल्यास मेंदू शांत होतो. स्मरणशक्ती सुधारते, एकाग्रता वाढते आणि निर्णयक्षमता चांगली राहते.
वजन नियंत्रणात राहण्यास मदत
उशिरा झोपल्याने भूक वाढवणारे हार्मोन्स असंतुलित होतात. लवकर झोपल्यास मेटाबॉलिझम सुधारतो आणि वजन नियंत्रणात राहतं.
त्वचा आणि केस निरोगी राहतात
रात्रीची झोप ही ‘ब्युटी स्लीप’ मानली जाते. लवकर झोपल्याने त्वचेची दुरुस्ती होते, चेहरा उजळ दिसतो आणि केस मजबूत राहतात.
ताणतणाव आणि चिडचिड कमी होते
पुरेशी झोप न मिळाल्यास मानसिक ताण वाढतो. लवकर झोपल्यास मन शांत राहतं आणि मूड चांगला राहतो.
रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते
लवकर झोपण्यामुळे शरीराची इम्युन सिस्टीम मजबूत होते. त्यामुळे आजारांशी लढण्याची ताकद वाढते.
झोपण्याआधी मोबाईल वापर टाळा
रात्री उशिरापर्यंत मोबाईल, टीव्ही पाहिल्याने झोप येत नाही. झोपण्याआधी किमान 30 मिनिटे स्क्रीनपासून दूर राहणं आवश्यक आहे.
ठराविक वेळेची सवय लावा
दररोज एकाच वेळेला झोपण्याची सवय लावल्यास शरीराची जैविक घड्याळ व्यवस्थित काम करते आणि लवकर झोप लागते.
हलका आहार आणि शांत वातावरण ठेवा
रात्री जड जेवण टाळा, कोमट दूध किंवा हलका आहार घ्या. खोलीत मंद प्रकाश आणि शांत वातावरण ठेवल्यास झोप लवकर लागते.