अलीकडे वयाच्या कोणत्याही टप्प्यावर डायबेटीसचे निदान होऊ शकते..लाईफस्टाइल मधील बदलामुळे होणारा हा आजार काही विशिष्ट सवयीनी नियंत्रणात आणणे शक्य आहे.याशिवाय खाण्यात बदल करूनही डायबेटीस नियंत्रणात ठेवता येऊ शकतो.तुम्ही गव्हाच्या चपाती ऐवजी नाचणीची भाकरी खाणे हा पर्याय निवडू शकता.नाचणी शरीरात साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवते.नाचणीचा ग्लायसीमॅक्स इंडेक्स कमी आहे त्यामुळे ती डायबेटीस रुग्णांसाठी अत्यंत फायदेशीर आहे.तसेक नाचणीमध्ये फायबर जास्त असल्याने पचनास फायदा होतो.नाचणीची भाकरी नाश्ता करताना किंवा दुपारच्या जेवणात खाल्ल्याने फायदा जास्त होतो