Turmeric Milk In Summer | पोटाची जळजळ की उष्णता? उन्हाळ्यात हळद-दूध घेण्याची 'ही' आहे योग्य पद्धत

पुढारी वृत्तसेवा

हळदीच्या दुधाला ‘गोल्डन मिल्क’ म्हणतात
हळद आणि दूध एकत्र केल्याने तयार होणारे पेय ‘गोल्डन मिल्क’ म्हणून ओळखले जाते. आयुर्वेदात याला आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक मानले जाते.

Turmeric Milk | (Canva Photo)

रोगप्रतिकारक शक्ती वाढते
हळदीमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुण रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करतात.

चांगली झोप लागण्यास मदत
रात्री झोपण्यापूर्वी हळदीचे दूध घेतल्यास शरीर शांत होते आणि झोपेची गुणवत्ता सुधारण्यास मदत होते.

सर्दी-खोकल्यावर फायदा
हळदीचे दुध सर्दी, खोकला आणि घशातील खवखव कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते.

शरीरातील सूज कमी करते
हळदीतील कर्क्युमिन घटक शरीरातील सूज आणि वेदना कमी करण्यास मदत करतो.

पचन सुधारण्यास मदत
काही लोकांमध्ये हे दूध पचन सुधारण्यास मदत करू शकते आणि शरीराला उब देते.

सर्वांसाठी योग्य नसते
ज्यांना लॅक्टोज इन्टॉलरन्स, पित्ताचा त्रास किंवा काही औषधं चालू असतील त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

किती प्रमाणात घ्यावे?
तज्ज्ञांच्या मते रात्री झोपण्यापूर्वी एक छोटा कप हळदीचे दूध पुरेसे असते.

योग्य पद्धत महत्त्वाची
दुधात चिमूटभर हळद, थोडी काळी मिरी आणि मध घातल्यास त्याचे फायदे अधिक वाढू शकतात.

Turmeric side effects
Workout Consistency | pudhari
<strong>येथे क्लिक करा...</strong>