पुढारी वृत्तसेवा
प्रोटीनची कमतरता भरून काढते
अंड्यात भरपूर प्रोटीन असते. हे केसांची मुळं मजबूत करून तुटणारे केस कमी करते.
कोरडेपणा दूर करते
थंडीत केस खूप ड्राय होतात. अंड्यातील नैसर्गिक फॅट्स केसांना ओलावा देतात आणि शाइन येते.
केस मऊ व स्मूद बनतात
अंड्यातील लेसिथिन केसांना सिल्की बनवते. फ्रिझ कमी होतो.
स्काल्पला पोषण मिळते
अंड्यामधील व्हिटॅमिन A, D आणि E स्काल्प हेल्दी ठेवतात आणि कोंडा कमी करतात.
हिवाळ्यात होणारा हेअर फॉल कमी होतो
मुळं मजबूत झाल्यामुळे केस गळणे कमी होते.
नैसर्गिक कंडिशनरचे काम करते
अंडे हे घरगुती डीप कंडिशनिंगसाठी सर्वोत्तम उपाय आहे.
केसांची वाढ जलद होते
प्रोटीन आणि बायोटिनमुळे नवीन केसांची वाढ सुधारते.
हिवाळ्यातील फिकटपणा कमी होतो
केस अधिक चमकदार आणि हेल्दी दिसतात.
स्प्लिट एंड्स कमी होतात
कोरडेपणामुळे होणारे केसांचे तुटलेले टोक कमी होण्यास मदत होते.