Pulses and Sprouts: पावसाळ्यात मोड आलेली कडधान्य का खावी? जाणून घ्या अद्भूत फायदे!

पुढारी वृत्तसेवा

पावसाळा आला की आपल्याला आरोग्याची काळजी घ्यावी लागते, ढगाळ वातावरणामूळे जठराग्नी मंदावलेला असतो यामुळे आहारात बदल करावा लागतो

यावेळी इतर भाज्या खाण्यापेक्षा तुम्ही मोड आलेली कडधान्य आहारात समाविष्ट केली तर तुम्हा आर्श्चकारक फायदे मिळतील

रोगप्रतिकारक शक्ती वाढते पावसाळ्यात संसर्गजन्य आजाराचा धोका खूप वाढतो कडधान्यांमधील व्हिटामिन सी व ॲन्टी ऑक्सिडंट तुमची शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत करते

पचनासाठी मोड आलेली धान्य उपयुक्त ठरतात मोड आल्यामुळे किंवा अंकूरीत झाल्यामुळे कडधान्यातील फायबरचे प्रमाण वाढते हे पाचनशक्ती वाढते, गॅसचा त्रास होत नाही

रक्ताची कमतरता दूर होते. मूग, मटकी, चणे यामध्ये लोहाचे प्रमाण खूप असते यामुळे शरीरातील हिमोग्लोबिन वाढते व तुमची ॲनेमिया होत नाही

प्रोटीनची उणीव भरून काढते, पावसाळ्यात मांस, मच्छी, चिकन यांचे प्रमाण कमी असते किंवा लोकांचा मांसाहाराकडे कल कमी असतो यावेळी शरीरातील प्रोटीनची गरज कडधान्य भरून काढतात

पावसाळयात हिरवे मूग, मटकी, काळे दाणे, चवळी, मसूर या कडधान्याचा आहारात प्रामुख्याने समावेश करावा

दमट वातावरणामुळे बॅक्टेरियाची वाढ वेगाने होत असते त्‍यामुळे कडधान्य कधीही कच्ची खाऊ नये उकळून, वाफवून किंवा शिजवूनच यांचा आहारात समोवश करावा

कांदा भजी व पावसाळा