Slow Eating Benefits: सावकाश जेवण्याचे ५ वैज्ञानिक फायदे

पुढारी वृत्तसेवा

आपण अनेकदा घाईघाईने जेवतो. पण तुम्हाला माहिती आहे का? सावकाश जेवण्याचे वैज्ञानिक फायदे आश्चर्यकारक आहेत.

वजन नियंत्रणात राहते

भरभर जेवल्याने अन्न नीट पचत नाही आणि शरीरात चरबी वाढते. सावकाश चावून खाल्ल्याने कमी कॅलरी पोटात जातात, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

मेंदूला मिळतात योग्य संकेत

आपले पोट भरल्याचा संदेश मेंदूपर्यंत पोहोचायला साधारण २० मिनिटे लागतात. हळूहळू जेवल्यामुळे तुम्ही गरजेपेक्षा जास्त खाणे टाळू शकता.

पचनक्रिया सुधारते

अन्न जेवढे जास्त चावून खाल, तेवढी तोंडातील लाळ त्यात व्यवस्थित मिसळते. यामुळे अन्नाचे पचन सुलभ होते आणि शरीराला सर्व पोषक घटक मिळतात.

मधुमेहाचा धोका कमी

सावकाश जेवल्यामुळे रक्तातील ग्लुकोजचे योग्य प्रकारे विघटन होते आणि शरीराला ऊर्जा मिळते. म्हणूनच मधुमेही व्यक्तींना नेहमी आरामात जेवण्याचा सल्ला दिला जातो.

पोटाच्या समस्यांपासून सुटका

व्यवस्थित चावून खाल्ल्यामुळे गॅस, अपचन आणि बद्धकोष्ठतेसारखे त्रास होत नाहीत. सवय लावण्यासाठी जेवणात सॅलडचा समावेश नक्की करा.

मानसिक शांतता आणि आनंद

अन्नाचा आस्वाद घेत सावकाश जेवल्याने चिडचिड कमी होते आणि रागावर नियंत्रण मिळवणे सोपे जाते.

म्हणूनच, आपल्याकडे अन्नसंस्कारांची शिकवणूक वर्षानुवर्षे दिली जाते. यामध्ये जेवताना कसे बसावे, जेवणापूर्वी हात धुवावेत यांसारख्या गोष्टी अनेकजण पाळतात.