Potato | बटाटा कसा खावा, सालीसहीत की साल काढून?

पुढारी वृत्तसेवा

बटाटा ही भाजी गृहिणींची सर्वात आवडती भाजी, जगातील कित्‍येक खाद्य पदार्थ हे बटाट्याशिवाय पूर्ण होत नाहीत. पण बटाटा सालीसहीत खाणे योग्य की साल काढून?

तज्ञांच्या मते बटाटा हा कार्बोहाड्रेटने परिपूर्ण भाजी असली तरी खरी पोषक तत्‍वे दडली आहेत त्‍याच्या सालीत

बटाट्याच्या सालीमध्ये फायबर, पोटॅशियम, Iron आणि व्हिटॅमिन-C भरपूर प्रमाणात असते. साल काढल्यामुळे ही पोषक तत्वे कमी होतात.

सालीमध्ये बटाट्याच्या आतील भागापेक्षा जास्त फायबर असते. हे फायबर पचन सुधारण्यास आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करण्यास मदत करते.

सालीमध्ये असलेल्या पोटॅशियममुळे रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते, जे हृदयाच्या आरोग्यासाठी उत्तम मानले जाते.

सालीसकट बटाटा खाल्ल्याने त्यातील फायबरमुळे रक्तातील साखर एकदम वाढत नाही, कारण ते पचायला जास्त वेळ घेते.

बटाट्याच्या सालीमध्ये पॉलिफेनॉलसारखे अँटी-ऑक्सिडंट्स असतात, जे शरीरातील पेशींचे नुकसान होण्यापासून संरक्षण करतात.

पण बटाटा सालिसहीत खाताना काय काळजी घ्यावी बटाटा जमिनीत उगवत असल्यामुळे सालीवर माती आणि बॅक्टेरिया असू शकतात.

त्यामुळे सालीसकट खाण्यापूर्वी बटाटा कोमट पाण्यात घासून स्वच्छ धुणे आवश्यक आहे.

तसेच बटाटा खिसला, कापला तर तो काहीवेळ पाण्यात बुडवून ठेवावा त्‍यामुळे त्‍याच्यातील स्टार्च कमी होईल व ते आरोग्यासाठी फायदेशिर ठरेल

कमी कॅलरी: जेव्हा तुम्ही बटाटा सालीसकट शिजवता किंवा बेक करता, तेव्हा त्यात तेलाचा वापर कमी होऊन त्याचे पौष्टिक मूल्य टिकून राहते.

जर बटाट्याची साल हिरव्या रंगाची दिसत असेल, तर तो भाग अजिबात खाऊ नका. यात 'सोलानाईन' (Solanine) नावाचे विषारी तत्व असू शकते, ज्यामुळे डोकेदुखी किंवा मळमळ होऊ शकते.