पुढारी वृत्तसेवा
पित्तज्वरात: हरभऱ्याच्या कोवळ्या पानांची भाजी करून देतात.
धातुक्षीणता : रोज मूठ दोन मूठ भाजलेले चणे खाऊन त्यावर गरम पाणी प्यावे.
मूळव्याध : गरम गरम चणे नेहेमी खावेत.
जलोदर : पन्नास ग्रॅम हरभरे एक लिटर पाण्यात उकळवून पाणी अर्धे राहिल्यावर भांडे खाली उतरवून त्यात दहा ग्रॅम जवरखार व एक-एक ग्रॅम सैंधव व पिंपळी घालून पाणी गाळून पिण्यास देतात.
जंत : मूठभर हरभरे शिरक्यात भिजत घालावेत व सकाळी रिकाम्यापोटी खावेत.
आवाज (सुरेल) सुधारण्यास चणे व गुळ एकत्र करून खावेत.
आवाज बसला असता : रात्री झोपण्यापूर्वी भाजलेले चणे खऊन वर गरम पाणी प्यावे.
खोकला : ढास कमी होण्यासाठी रात्री भाजलेले चणे खाऊन त्यावर पाव लिटर दूध पिण्याने सकाळी कफ मोकळा होऊन पडतो.
सर्दीत : गरम गरम चण्याचा वास घेतला असताही आराम पडतो.
शरीराला घामाची दुर्गंधी : सर्वांगास पाण्यात कालवलेले बेसन लावून थोड्या वेळाने स्नान करावे.
चेहेऱ्याची त्वचा कोमल होण्यास व त्वचेस तजेला येण्यास पिठात थोडे पाणी व थोडेसे साजुक तूप घालून शरीरावर लेप करावा. लेप पूर्ण सुकण्यापूर्वी ओल्या फडक्याने पुसून काढून नंतर आवश्यक तर रिठ्याचे पाण्याने अंग व चेहेरा धुवावा.