पुढारी वृत्तसेवा
थंडीत कोरडी होणारी त्वचा, काकडीच्या पाण्यामुळे नैसर्गिकरित्या हायड्रेटेड (Hydrated) राहते. त्वचेतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी काकडीचे पाणी उत्तम काम करते. हे त्वचेला तेलकट न करता खोलवर पोषण देते.
काकडीमध्ये असलेले अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म थंडीमुळे किंवा हवेमुळे होणारी जळजळ, लालसरपणा आणि खाज कमी करतात. यामुळे त्वचेला तात्काळ थंडावा आणि आराम मिळतो.
काकडीच्या पाण्यात अॅस्ट्रिंजेंट गुणधर्म असतात, जे त्वचेचे पोअर्स बंद करण्यास मदत करतात. यामुळे त्वचा टायट आणि तरुण दिसते. तसेच, त्यात असलेले व्हिटॅमिन-सी त्वचेला नैसर्गिक चमक देते.
थंडीत झोप कमी झाल्यास किंवा थकवा असल्यास डोळ्यांखाली काळे वर्तुळ दिसू लागतात. काकडीचे पाणी कापसाच्या मदतीने डोळ्यांखाली लावल्यास आणि साध्या काकडीचे काप डोळ्यांवर ठेवल्यास, डोळ्यांखालील सूज आणि काळसरपणा कमी होतो.
काकडी तेलकट त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे. हे त्वचेतील जास्त तेल शोषून घेते आणि चेहऱ्यावरील चमक कमी करते, ज्यामुळे मुरुमे आणि पुटकुळ्या येणे कमी होते.
काकडीत बीटा-कॅरोटीन आणि व्हिटॅमिन-के सारखे अँटी-ऑक्सिडंट्स असतात. हे त्वचेला मुक्त रॅडिकल्सच्या नुकसानीपासून वाचवतात आणि त्वचेला एजिंग पासून दूर ठेवण्यास मदत करतात.
काकडीचे पाणी एक उत्तम नैसर्गिक टोनर म्हणून काम करते. चेहरा धुतल्यानंतर टोनरऐवजी हे पाणी लावल्यास त्वचेचा PH स्तर संतुलित राहतो.
काकडी किसून तिचा रस काढा. हा रस तुम्ही थेट चेहऱ्यावर लावा किंवा तो एका स्प्रे बॉटलमध्ये भरून फ्रिजमध्ये ठेवा. दिवसातून दोनदा याचा वापर करा.