पोटासाठी 'काळे मनुके' गुणकारी ठरतात, मात्र 'या' समस्या असलेल्यांनी चुकूनही खाऊ नयेत

पुढारी वृत्तसेवा

पचनसंस्था सुधारते

काळ्या मनुक्यांमध्ये भरपूर फायबर असते, जे पचनक्रिया सुरळीत करून पोटाच्या तक्रारी दूर करण्यास मदत करते.

Improves digestive system

बद्धकोष्ठतेपासून सुटका

रात्री भिजवलेले मनुके सकाळी खाल्ल्याने बद्धकोष्ठतेचा (Constipation) त्रास कमी होतो आणि पोट साफ राहते.

Relief from constipation

नैसर्गिक डिटॉक्स

हे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करतात, ज्यामुळे आतड्यांचे आरोग्य सुधारते.

Natural Detox

ॲसिडिटीवर गुणकारी

काळ्या मनुक्यांचा स्वभाव थंड असल्याने ते छातीतील जळजळ आणि ॲसिडिटी कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतात.

acidity | file photo

मधुमेहींनी सावध राहावे

मनुक्यांमध्ये नैसर्गिक शर्करा जास्त असते, त्यामुळे हाय शुगर असलेल्या रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय याचे सेवन करू नये.

Diabetics | canva photo

अतिसार (Diarrhea) असल्यास टाळा

ज्यांना वारंवार जुलाब किंवा पोटाचे इन्फेक्शन होते, त्यांनी मनुके खाणे टाळावे, कारण यातील फायबरमुळे त्रास वाढू शकतो.

Diarrhea

ऍलर्जीची समस्या

काही लोकांना ड्राय फ्रूट्सची ऍलर्जी असते, अशा व्यक्तींनी मनुके खाल्ल्यास त्वचेवर रॅशेस किंवा खाज येऊ शकते.

Allergy problem

मर्यादित सेवन आवश्यक

पोटासाठी चांगले असले तरी दिवसाला ५-७ पेक्षा जास्त मनुके खाऊ नयेत, अन्यथा पोट फुगणे किंवा गॅसची समस्या होऊ शकते.