Belum Caves | बेलम गुहा : १५० फूट खोल जमिनीखाली निसर्गाने कोरलेले शिवलिंग!

Namdev Gharal

आंध्र प्रदेशमध्ये एक निसर्गाचा अनोखा चमत्‍कार पाहायला मिळतो. तो म्हणजे चित्रावती नदीपात्रातील १५० फूट जमिनीखाली तयार झालेल्या गुहा बेलम गुहा (Belum Caves)

बेलम गुहा (Belum Caves) ही भारतीय उपखंडातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी आणि विस्तीर्ण नैसर्गिक गुहा प्रणाली आहे.या गुहांमध्ये नैसर्गिक कोरीव काम दिसून येते

या गुहा मानवनिर्मित किंवा हाताने कोरलेल्या नसून, लाखो वर्षांपूर्वी 'चित्रावती' नदीच्या भूमिगत पाण्याच्या प्रवाहामुळे चुनखडीच्या (Limestone) खडकांची नैसर्गिक झीज होऊन तयार झाल्या आहेत.

पाण्याच्या थेंबांमधून पाझरणाऱ्या कॅल्शियममुळे गुहेच्या छतावर आणि जमिनीवर शिवलिंग, हजार फण्यांचा नाग अशा विस्मयकारक नैसर्गिक आकृत्या तयार झाल्या आहेत.

१८८४ मध्ये ब्रिटिश भूवैज्ञानिक रॉबर्ट ब्रूस फूट यांनी या गुहांचा पहिला अधिकृत उल्लेख केला; त्यानंतर १९८२-८४ मध्ये जर्मन संशोधक हर्बर्ट डॅनिएल गेबाऊर यांच्या पथकाने गुहेच्या अंतर्गत भागांचे विस्तृत सर्वेक्षण केले.

आंध्र प्रदेश पर्यटन विकास महामंडळाने (APTDC) १९९९ मध्ये गुहेचे संवर्धन हाती घेऊन २००२ मध्ये पर्यटकांसाठी खुले केले, ज्यामध्ये आकर्षक विद्युत रोषणाई, पायऱ्या आणि ऑक्सिजन पुरवठा यंत्रणा बसवली आहे.

प्राचीन काळात येथे बौद्ध आणि जैन भिक्षू ध्यानधारणेसाठी राहत असल्याचे पुरावे सापडले आहेत; गुहेत सापडलेली बौद्ध अवशेषांची भांडी सध्या अनंतपूर येथील संग्रहालयात जतन केलेली आहेत.

पाताळ गंगा : गुहेचा सर्वात खोल भाग जमिनीपासून सुमारे १५० फूट (४६ मीटर) खाली आहे, जिथे एक बारमाही भूमिगत पाण्याचा प्रवाह वाहतो, ज्याला 'पाताल गंगा' म्हटले जाते.

'सप्तस्वर गुहा' : गुहेतील एका दालनात असलेल्या चुनखडीच्या नैसर्गिक खांबांवर हाताने हलका आघात केल्यास संगीताचे वेगवेगळे सूर ऐकू येतात.