Belly fat loss: पोटाची चरबी कमी करण्यासाठी घरच्या घरी 'हे' ५ सोपे व्यायाम करा
पुढारी वृत्तसेवा
जिममध्ये जाण्यासाठी वेळ मिळत नसेल, तर ५ सोप्या व्यायामांच्या मदतीने तुम्ही घरच्या घरी पोटाची चरबी कमी करू शकता.
belly fat reduction foods | file photo
१. प्लँक (Plank)
पोटाच्या स्नायूंना मजबुती देण्यासाठी प्लँक हा सर्वात प्रभावी व्यायाम मानला जातो.
Belly fat | Canva
कसे करावे: जमिनीवर पुश-अप्सच्या स्थितीत या, पण शरीराचा भार तळहाताऐवजी कोपर आणि हातांच्या पुढच्या भागावर ठेवा. डोक्यापासून पायापर्यंत शरीर एका सरळ रेषेत ठेवा. ३० ते ६० सेकंद या स्थितीत राहण्याचा प्रयत्न करा.
२. बायसिकल क्रंचेस
हा व्यायाम पोटाच्या वरच्या आणि खालच्या स्नायूंना टोन करण्यासाठी आणि 'लव्ह हँडल्स' कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे.
कसे करावे: पाठीवर झोपून दोन्ही हात डोक्याच्या मागे ठेवा. पाय हवेत उचलून गुडघ्यात वाकवा. आता सायकल चालवल्याप्रमाणे उजवा कोपर डाव्या गुडघ्याला आणि डावा कोपर उजव्या गुडघ्याला टेकवण्याचा प्रयत्न करा.
३. लेग रेजेस
पोटाच्या खालच्या भागातील चरबी कमी करणे सर्वात कठीण असते, तिथे 'लेग रेजेस' महत्वाचे.
कसे करावे: जमिनीवर सरळ झोपून हात कमरेच्या खाली ठेवा. पाय गुडघ्यात न वाकवता हळूहळू ९० अंशापर्यंत वर उचला आणि पुन्हा हळूहळू खाली न्या. पाय जमिनीला टेकण्यापूर्वीच पुन्हा वर उचला.
४. माउंटेन क्लाइम्बर्स
कॅलरी वेगाने बर्न करण्यासाठी आणि रक्ताभिसरण सुधारण्यासाठी हा व्यायाम सर्वोत्तम आहे.
कसे करावे: प्लँकच्या स्थितीत या. आता ज्याप्रमाणे डोंगर चढतो, त्याप्रमाणे एकामागून एक पाय पोटाच्या दिशेने वेगाने जवळ आणा. हा व्यायाम जितक्या वेगाने कराल, तितका जास्त फायदा होईल.
५. रशियन ट्विस्ट
कमरेचा आकार सुबक करण्यासाठी आणि पोटाचे स्नायू पिळदार करण्यासाठी हा व्यायाम फायदेशीर ठरतो.
कसे करावे: जमिनीवर बसून गुडघे थोडे वाकवा. थोडे मागे झुकून पाय जमिनीपासून हलके वर उचला. आता दोन्ही हात एकत्र पकडून शरीर एकदा उजवीकडे आणि एकदा डावीकडे फिरवा.