Beauty Tips : मुलतानी माती लावण्याची योग्य पद्धत कोणती? स्किन टाईपनुसार महत्त्वाच्या टिप्स

पुढारी वृत्तसेवा

मुलतानी माती पिढ्यानपिढ्या वापरली जात असली, तरी तुमच्या स्किन टाईपनुसार योग्य घटकांसह लावल्यासच तिचा पूर्ण फायदा मिळतो.

तुमची त्वचा तेलकट असेल, तर मुलतानी मातीमध्ये गुलाब पाणी मिसळून सोपा आणि प्रभावी फेस पॅक तयार करा.

हा पॅक चेहऱ्यावर नेहमी पातळ थरामध्ये (Thin Layer) लावावा, ज्यामुळे अतिरिक्त तेल शोषून घेण्यास मदत होते.

कोरड्या त्वचेवर फक्त मुलतानी माती लावल्यास त्वचा अधिक रुक्ष, कोरडी आणि ताणलेली वाटू शकते.

मुलतानी मातीत गुलाब पाण्यासोबत थोडे ग्लिसरीन मिसळा. यामुळे मुलतानी मातीचे फायदे मिळतील आणि त्वचेतील ओलावाही टिकून राहील.

पिंपल्स किंवा मुरुम असलेल्या त्वचेसाठी मुलतानी माती, गुलाब पाणी आणि नैसर्गिक मध यांचे मिश्रण उत्तम काम करते.

चेहऱ्यावर जास्त सूज असलेले किंवा ॲक्टिव्ह पिंपल्स असतील, तर संपूर्ण चेहऱ्यावर मास्क लावण्यापूर्वी आधी पॅच टेस्ट (Patch Test) नक्की करा.

मुलतानी माती चेहऱ्यावर पूर्ण सुकवून त्वचा ताणली जाईपर्यंत ठेवू नका. पॅक साधारण ७०% सुकल्यावरच थंड किंवा साध्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.

फेस पॅक धुतल्यानंतर त्वचेला मॉइश्चराइज करणे अत्यंत गरजेचे आहे. तेलकट त्वचेसाठी जेल-बेस्ड मॉइश्चरायझर वापरा.

तुमची त्वचा कोरडी असल्यास पॅक काढल्यानंतर लगेच डीप हायड्रेटिंग मॉइश्चरायझर लावा, ज्यामुळे त्वचेचा नॅचरल ग्लो टिकून राहील.