पुढारी वृत्तसेवा
तमालपत्र शिजवताना त्यातील नैसर्गिक तेलं पदार्थात मिसळतात, ज्यामुळे खास मसालेदार फ्लेवर मिळतो.
तमालपत्रामध्ये दालचिनी, लवंग, काळी मिरी, वेलची आणि जायफळ यांसारख्या मसाल्यांच्या सुगंधाची हलकी छटा जाणवू शकते.
पुलाव, बिर्याणी, डाळ आणि ग्रेव्ही प्रकारातील पदार्थांमध्ये तमालपत्राचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.
आयुर्वेदानुसार तमालपत्र पचनक्रिया सुधारण्यास आणि पोट फुगण्याची समस्या कमी करण्यास मदत करू शकते.
तमालपत्रामध्ये काही अँटिऑक्सिडंट घटक आढळतात, जे शरीरासाठी फायदेशीर ठरू शकतात.
तमालपत्राची चव आणि सुगंध तीव्र असतो. त्यामुळे एक किंवा दोन पाने पुरेशी ठरतात.
बहुतेक वेळा तमालपत्र फक्त फ्लेवरसाठी वापरले जाते. पदार्थ वाढण्यापूर्वी ते काढून टाकणे योग्य ठरते.
गरम मसाला नसतानाही अनेक पदार्थांना रेस्टॉरंटसारखा सुगंध देण्याचे काम तमालपत्र करू शकते.