मधुमेह असलेल्या लोकांनी या फुलाची भाजी खावी!

पुढारी वृत्तसेवा

केळफूल विशेषतः भाजीसाठी वापरले जाते. आरोग्यदायी केळफुलाचे शरीराला अनेक फायदे होतात.

मधुमेहावर नियंत्रण

मधुमेह असलेल्या व्यक्तींनी आहारात केळफुलाची भाजी समाविष्ट केल्यास वारंवार लघवीला होण्याचा त्रास आणि त्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होते.

भूक वाढवण्यासाठी: ज्यांना भूक मंदावण्याची समस्या आहे, त्यांनी केळफुलाची भाजी जेवणात घ्यावी.

आमांश कमी करण्यासाठी: केळफुलाची भाजी करून खाल्ल्याने आमांश नाहीसा होतो.

जंताच्या विकारांवर: काही दिवस नियमितपणे केळफुलाची भाजी खाल्ल्याने कृमीविकार दूर होतो.

श्वासविकार (दमा): केळफुलातील केशरयुक्त भाग कापून, त्यात रात्री मिरपूड भरून ठेवावी. सकाळी हा भाग गाईच्या तुपात तळून खावा.

जंतामुळे मुलांना होणारे जुलाब: लहान मुलांना जंतामुळे जुलाब होत असल्यास, केळफुलाचा रस आणि वावडिंग पावडर एकत्र करून देतात.

अत्यार्तव (मासिक पाळीत जास्त रक्तस्राव होणे): मासिक पाळीच्या वेळी अतिरिक्त प्रमाणात रक्तस्राव होण्याचा त्रास असणाऱ्या स्त्रियांनी सतत ४-५ दिवस जेवणात केळफुलाची भाजी घ्यावी, ती अत्यंत हितावह ठरते.