Bajau People : ऑक्सिजनशिवाय पाण्यात 13 मिनिटांपर्यत राहणारी जमातः पाण्याखाली सहजपणे चालूही शकतात

Namdev Gharal

सामान्य माणूस पाण्याखाली फार फार तर १ ते २ मिनिटे श्वास रोखू शकतो, मात्र बाजाऊ लोक कोणत्याही ऑक्सिजन सिलेंडरशिवाय तब्बल १० ते १३ मिनिटे पाण्याखाली राहू शकतात.

इंडोनेशिया, मलेशिया आणि फिलिपिन्सच्या सागरी सीमांवर राहणाऱ्या बाजाऊ लोकांना जगातील 'रिअल लाईफ अ‍ॅक्वामॅन' म्हटले जाते. त्यांचे संपूर्ण आयुष्य जमिनीऐवजी समुद्रावरच व्यतीत होते.

हे लोक समुद्राच्या तळाशी तब्बल २०० फुटांपेक्षा जास्त खोल सहज डायव्हिंग करतात. एवढ्या खोलीवर पाण्याचा दबाव प्रचंड असतो, तरीही ते तिथे सामान्य माणसासारखे वावरतात.

पाण्याखाली गेल्यावर तरंगण्याऐवजी हे लोक एखाद्या जंगलात फिरल्यासारखे समुद्राच्या तळाशी जमिनीवर सहज चालतात आणि माशांची शिकार करतात.

शास्त्रज्ञांच्या संशोधनानुसार, शेकडो वर्षांपासून समुद्रात राहिल्यामुळे त्यांच्या शरीरात उत्क्रांती झाली आहे. त्यांची 'प्लिहा' (Spleen) सामान्य माणसापेक्षा ५०% मोठी असते, जी शरीरात जास्त ऑक्सिजनयुक्त रक्त पुरवण्यास मदत करते.

बाजाऊ लोकांच्या डोळ्यांची रचनाही वेगळी झाली आहे. त्यांचे डोळे पाण्याखालील तीव्र प्रकाशाशी जुळवून घेतात, ज्यामुळे त्यांना समुद्राच्या गढूळ पाण्यातही अगदी स्पष्ट दिसते.

लहानपणीच पाण्याच्या प्रचंड दाबामुळे कान फुटू नयेत म्हणून हे लोक पारंपरिक पद्धतीने स्वतःचे कानचे पडदे पंक्चर करतात. यामुळे त्यांना वेदना होतात, पण पाण्याचा दाब सहन करणे सोपे जाते.

'लेपा-लेपा' बोटींवर संसार: बाजाऊ लोकांचा जन्म, लग्न आणि मृत्यूही समुद्रातच होतो. ते 'लेपा-लेपा' नावाच्या पारंपरिक लाकडी बोटींवर किंवा समुद्रात खांबांवर बांधलेल्या झोपड्यांमध्ये राहतात.

त्यांच्या जगण्याचे एकमेव साधन म्हणजे मासेमारी आहे. ते शिकार करण्यासाठी आधुनिक गन न वापरता हाताने बनवलेले लाकडी चष्मे आणि लाकडी भाले वापरतात.

सर्वात मोठी शोकांतिका म्हणजे, या 'अ‍ॅक्वामॅन'कडे कोणत्याही देशाचे पासपोर्ट किंवा अधिकृत ओळखपत्र नाही. ते कोणत्याही देशाचे नागरिक नसून केवळ 'समुद्राचे राजे' म्हणून जगतात.