पुढारी वृत्तसेवा
बैठी जीवनशैली
तासनतास एकाच ठिकाणी बसून काम केल्यामुळे पाठीच्या स्नायूंवर ताण येतो आणि कंबरदुखी सुरू होते.
चुकीची बसण्याची पद्धत
काम करताना किंवा मोबाईल वापरताना वाकून बसल्याने मणक्याचे नैसर्गिक संतुलन बिघडते.
व्यायामाचा अभाव
शरीराची पुरेशी हालचाल न झाल्याने कंबरेचे स्नायू कमकुवत होतात, ज्यामुळे वेदना वाढतात.
जड वस्तू उचलणे
अचानक किंवा चुकीच्या पद्धतीने जड वजन उचलल्यामुळे कंबरेच्या नसांवर दाब पडू शकतो.
वाढते वजन
शरीराचे वजन जास्त असेल तर त्याचा थेट भार मणक्यावर येतो, परिणामी कंबरदुखीचा त्रास होतो.
कॅल्शियमची कमतरता
आहारात कॅल्शियम आणि व्हिटॅमिन D च्या कमतरतेमुळे हाडे ठिसूळ होतात आणि पाठ-कंबर दुखू लागते.
मानसिक ताण (Stress)
अतिप्रमाणात मानसिक ताण घेतल्यामुळे शरीरातील स्नायू आखडतात, ज्याचा परिणाम कंबरेवर होतो.
अपुरी झोप आणि चुकीची गादी
झोपण्यासाठी खूप मऊ किंवा खूप कडक गादी वापरल्याने देखील कंबरेच्या समस्या उद्भवू शकतात.