पुढारी वृत्तसेवा
बदलत्या जीवनशैलीमुळे आणि शरीराच्या चुकीच्या हालचालींमुळे अलीकडे पाठदुखीचा त्रास अनेक व्यक्तींमध्ये दिसून येतो.
पाठदुखी ही वेगवेगळ्या प्रकारची असते. परंतु, कमरेच्या खालच्या भागातील म्हणजे कमरेजवळच्या भागात दुखणे ही सध्या जवळपास 80 टक्के व्यक्तींमध्ये आढळून येणारी तक्रार आहे.