बाळ आईचे दूध पीत नसेल तर काय करावे?

पुढारी वृत्तसेवा

बाळ दूध पिण्यास नकार देत आहे?

प्रत्येक आई-वडिलांची ही चिंता असते. पण घाबरू नका, काही सोपे उपाय फायद्याचे ठरू शकतात.

Baby Milk | Pudhari

बळजबरी अजिबात करू नका

बाळ दूध पीत नसेल तर जबरदस्ती करू नका. त्यामुळे बाळ अधिक चिडचिडे होऊ शकते आणि दूधाविषयी नकारात्मक भावना निर्माण होऊ शकते.

Baby Milk | Pudhari

आधी बाळाला शांत करा

रडणारे किंवा अस्वस्थ बाळ सहसा दूध पित नाही. त्याला कुशीत घ्या, थोपटा आणि शांत झाल्यावर पुन्हा प्रयत्न करा.

Baby Milk | Pudhari

दूध पाजण्याची स्थिती बदला

कधी कधी बाळाला एखादी विशिष्ट पोझिशन आवडत नाही. वेगवेगळ्या स्थितीत दूध पाजून पाहा.

Baby Milk | Pudhari

थोडं-थोडं दूध द्या

एका वेळी जास्त दूध पिण्याऐवजी काही बाळं कमी प्रमाणात पण वारंवार दूध पिणं पसंत करतात.

Baby Milk | Pudhari

गॅस किंवा ॲसिडिटीचा त्रास तर नाही?

बाळ खूप रडत असेल, पाठ मागे वाकवत असेल किंवा दूध पिताना त्रास होत असेल तर गॅस किंवा ॲसिडिटीची समस्या असू शकते.

Baby Milk | Pudhari

फॉर्म्युला दूधाची चव बदलून पाहा

जर बाळ फॉर्म्युला दूध पीत नसेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने फॉर्म्युला बदलण्याचा किंवा थोडे आईचे दूध मिसळण्याचा विचार करा.

Baby Milk | Pudhari

नवजात बाळासाठी वाटी-चमचा वापरा

बाळ आईचे दूध ओढत नसेल तर आईचे दूध काढून वाटी किंवा चमच्याने पाजता येते.

Baby Milk | Pudhari

१ वर्षांनंतर दुधाचे पर्यायही आहेत

दही, चीज, पनीर, टोफू यांसारखे कॅल्शियमयुक्त पदार्थ मुलांच्या आहारात समाविष्ट करू शकता.

Baby Milk | Pudhari

डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?

बाळ सतत दूध नाकारत असेल, वजन वाढत नसेल किंवा खूप अशक्त दिसत असेल तर त्वरित बालरोगतज्ज्ञांचा सल्ला घ्या.

Baby Milk | Pudhari

जांभूळ खाण्यापूर्वी सावधान! 'या' 5 लोकांनी चुकूनही खाऊ नये, नाहीतर...

Jamun | Pudhari
येथे क्लिक करा