Namdev Gharal
आफ्रिकेच्या जंगलात एक असे माकड आहे जे खरोखर निडर असतात हे काेणावरही हल्ला करण्यास घाबरत नाहीत
ही माकडे म्हणजे बबूनBaboons, यांचे दात- स्नायू ताकदवर असतात, आणि ही माकडे चिडतात त्यावेळी कोणावरही हल्ला करण्यास घाबरत नाहीत, याच्या प्रामुख्याने ५ मुख्य प्रजाती मानल्या जातात
हे जंगलातील अत्यंत आक्रमक आणि चपळ माकडे मानले जातात. त्यांच्या धाडसी वृत्तीमुळे त्यांना अनेकदा 'जंगलातील गुंड' म्हटले जाते.
सिंह हा बबूनचा नैसर्गिक शत्रू आहे. एकटा बबून सिंहाचा सामना करू शकत नाही, पण जेव्हा बबूनची अख्खी टोळी एकत्र येते, तेव्हा ते सिंहावर किंवा बिबट्यावर उलट हल्ला करतात.
बबून खूप ओरडतात आणि हिंसकपणे अंगावर धावून जातात. यामुळे अनेकदा तरुण सिंह किंवा बिबट्या आपला जीव वाचवण्यासाठी तिथून पळ काढतात.
यांचे सर्वात माठे हत्यार म्हणजे यांचे सुळे, बबूनचे सुळे सिंहाच्या दातांइतकेच मोठे आणि तीक्ष्ण असतात, दोन इंच लाब, जे शत्रूला गंभीर जखमी करू शकतात.
मुख्य म्हणजे बबून सर्वभक्षक असतात ते फक्त फळे खात नाहीत, तर ते लहान हरणे आणि इतर प्राण्यांची शिकारही करतात.
बबून टोळी करुन राहतात एका टोळीत ५० ते १०० पेक्षा जास्त बॅबून असू शकतात. टोळीचे नेतृत्व एक शक्तिशाली नर (Alpha Male) करतो
ही माकडे मुख्यतः: आफ्रिका खंडात (सहारा वाळवंटाच्या दक्षिण भागात).अरब द्वीपकल्पातील काही भाग (उदा. इथिओपिया, येमेन) या देशांमध्ये आढळतात
ते खूप चपळ आणि बुद्धिमान असतात, शत्रूला घेरण्यात ते माहिर असतात.अन्नासाठी ते मानवी वस्त्यांमध्ये शिरून चोरी करायलाही घाबरत नाहीत.
यांच्या प्रमुख नर ४० किलोपर्यंत वजनाचा असतो, तर सरासरी यांची उंची २० ते ४५ इंच इतकी असते, प्रजातीप्रमाणे वजन उंचीमध्ये फरक असतो.