Acidity: केवळ औषधे घेऊन पित्त जात नाही! आयुर्वेदानुसार नक्की काय करावे?

पुढारी वृत्तसेवा

शरीरात वाढलेल्या पित्ताची वेळीच आणि काळजीपूर्वक चिकित्सा करणे आवश्यक आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, स्वतःच्या मनाने औषधे घेणे त्वरित बंद करा.

acidity | file photo

तुमच्या जवळच्या आयुर्वेदिक वैद्यांना भेटा. त्यांना तुमची जीवनशैली सविस्तर सांगा. तुमच्या सवयींमधील 'योग्य काय आणि अयोग्य काय' हे समजून घेऊन, दिनचर्येत आवश्यक बदल करा.

ayurvedic | file photo

केवळ औषधांनी आजार पूर्णपणे बरा होत नाही. ज्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे पित्त वाढले आहे, त्या बदलणे अनिवार्य आहे. तुमच्या प्रकृतीनुसार कोणता आहार घ्यावा, याची माहिती वैद्यांकडून आवर्जून घ्या.

आम्लपित्ताच्या रुग्णांनी वमन आणि विरेचन यांसारखी पंचकर्मे करून शरीर शुद्ध करून घेणे फायदेशीर ठरते. यामुळे शरीरातील वाढलेली आम्लता मुळापासून कमी होण्यास मदत होते.

पंचकर्माचे नियम शास्त्राने ठरवून दिले आहेत, त्यामुळे हे उपचार तज्ज्ञ वैद्यांच्या देखरेखीखालीच करावेत.

अनेकांना सकाळी ब्रश करताना मुद्दाम उलट्या काढण्याची सवय असते. हे अत्यंत घातक असून यामुळे तुम्ही इतर आजारांना निमंत्रण देता. अशा वेळी वमन-विरेचन आणि जीवनशैलीत बदल करणेच श्रेयस्कर ठरते.

Acidity | file photo

डाळिंब रस, गुलकंद, कोकम, कोहळा, मोरावळा, ज्येष्ठमध, काळे मनुके हे रोजच्या व्यवहारातील पित्तशामक पदार्थ आहेत. यांचा आपल्या रोजच्या खाण्यामध्ये समावेश करावा.

Amla Remedies for Acidity | file photo

लिंबू सरबत देखील पित्तशामक आहे; परंतु काही विशिष्ट प्रकृतिच्या लोकांना लिंबू सरबत घेतल्याने त्रास वाढतो. त्यामुळे ज्यांना लिंबू सरबताचा त्रास होत नाही त्यांनीच लिंबू सरबत घ्यावा.

lime and lemon | canva

केवळ आहारच नाही, तर मानसिक स्थितीचाही पित्ताशी संबंध असतो. सततचे जागरण टाळा. चिडचिड आणि अतिविचार करणे थांबवा. पुरेशी झोप आणि मनःशांती पित्त कमी करण्यास मदत करते.

Sleep problems and solutions | Canva photo