पुढारी वृत्तसेवा
आयुर्वेदिक स्किनकेअर ही भारताच्या प्राचीन वैद्यकीय पद्धतीवर आधारित आहे आणि त्याचे उपाय वेगवेगळ्या त्वचेच्या प्रकारांनुसार आणि गरजांनुसार तयार केले जातात.
आयुर्वेद आणि गट हेल्थ कोच डॉ. डिंपल जांघडा यांनी त्यांच्या अलीकडील इंस्टाग्राम पोस्टमध्ये काही आयुर्वेदिक स्किनकेअर उपाय शेअर केले आहेत.
१. कफ त्वचेची काळजी
कफ प्रकृती असलेल्या लोकांची त्वचा मऊ आणि तेलकट असते. त्यांच्या स्किनकेअर रूटीनमध्ये त्वचा स्वच्छ करणे आणि मॉइश्चरायझिंगचा समावेश असणे आवश्यक आहे.
घरगुती उपाय: Pores स्वच्छ ठेवण्यासाठी हरभऱ्याचे पीठ (बेसन) आणि दुधापासून बनवलेल्या घरगुती फेस स्क्रबचा वापर करा.
टीप: उटणे, बेसन, मुलतानी माती आणि औषधी चूर्ण वापरून कोरडी मालिश करा. याशिवाय, 'ड्राय ब्रशिंग'मुळे त्वचेखालील चरबी कमी होण्यास मदत होते. नेहमी वॉटर-बेस्ड मॉइश्चरायझर वापरा.
२. पित्त त्वचेची काळजी
पित्त प्रकृती असलेल्यांना कडक स्किनकेअर रूटीनची गरज असते. चेहऱ्यावर तेल-आधारित किंवा अशा उत्पादनांनी मालिश करा जी त्वचेचा pH समतोल राखतील आणि अतिरिक्त तेलावर नियंत्रण मिळवतील.
घरगुती उपाय: असा एक्सफोलिएटर निवडा जो हलका असेल आणि त्वचेला इजा पोहोचवणार नाही. यामुळे छिद्रांमध्ये साचलेले बॅक्टेरिया आणि सीबम काढण्यास मदत होईल.
टीप: एक्सफोलिएशननंतर गुलाबपाण्यासारख्या नैसर्गिक ॲस्ट्रिंजेंटचा वापर करून छिद्रे बंद करा आणि नंतर वॉटर-बेस्ड मॉइश्चरायझर लावा.
३. वात त्वचेची काळजी
वात प्रकृती असलेल्या लोकांची त्वचा आणि केस खूप कोरडे व रखरखीत असतात. त्यामुळे तेल किंवा तुपाने शरीराची मालिश करणे फायदेशीर ठरते.
घरगुती उपाय: आठवड्यातून २-३ वेळा अंघोळीच्या एक तास आधी संपूर्ण शरीराला तेलाने मसाज करा.
टीप: त्वचेवर कोल्ड-प्रेस्ड तेल किंवा साजूक तुपाचा वापर करा. कडक क्लिन्झर वापरणे टाळा. अधूनमधून उटणे दह्यासोबत मिसळून लावू शकता. शेवटी तेल-आधारित मॉइश्चरायझर नक्की लावा.