पुढारी वृत्तसेवा
बदलती जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या वेळा यामुळे सध्या अनेकांना आम्लपित्ताचा त्रास जाणवतो.
आपल्या स्वयंपाकघरातील काही घटक आणि आयुर्वेदातील सोपे उपाय या समस्येवर अत्यंत प्रभावी ठरू शकतात.
आयुर्वेदानुसार आम्लपित्तासाठी 'साळी हरड' हे श्रेष्ठ औषध मानले जाते.
पित्ताचा त्रास कमी करण्यासाठी लहान काळी हरडीचे चूर्ण दोन ग्रॅम आणि गुळ दोन ग्रॅम मिसळून सायंकाळी जेवणानंतर खाऊन पाणी प्यावे.
आठवडाभर हरड-गुळ सेवन केल्याने पित्तापासून आराम मिळतो.
सकाळी आणि संध्याकाळी जेवणानंतर एक-एक लवंग चघळल्याने पित्ताचा त्रास कमी होतो.
आम्लपित्ताचा त्रास असणाऱ्या व्यक्तींना चहा नुकसानकार असतो. म्हणून जोपर्यंत पित्ताचा त्रास असेल तोपर्यंत चहा घेऊ नये.
लिंबाचा रस कोमट पाण्यात मिसळून सायंकाळी प्यायल्याने पित्त कमी होते.
एक कप पाणी व एक चमचा लिंबाचा रस एक-एक तासाने तीन वेळा घेतल्यास लवकर आराम मिळतो.