पुढारी वृत्तसेवा
कंबरदुखीपासून आराम मिळवण्यासाठी उपयुक्त आयुर्वेदिक उपाय.
कंबर दुखीचा उपचार सुरू असताना तळलेल पदार्थ, भात, उडदाची डाळ, इत्यादी वर्ज्य करावे. उकळलेल पाणी प्यावे.
उपाय : १) रात्री ६० ते ७० ग्रॅम गहू पाण्यात भिजवून ठेवावे.
सकाळी या गव्हात ३० ग्रॅम खसखस व ३० ग्रॅम धणे मिसळून बारीक वाटून घ्यावे.
त्यात अर्धा लिटर दूध टाकून उकळावे.
हे मिश्रण गरजेनुसार दोन आठवडे लागोपाठ घेत राहिल्याने कंबरेचे दुखणे थांबते.
उपाय : २) जायफळ पाण्यात उगाळून तिळाच्या तेलात मिसळून गरम करावे.
चांगले गरम झाल्यावर थंड करून कंपरेवर चोळल्याने दुखणे एकदम थांबते.
उपाय : ३) एक चमचा आल्याच्या रसात अर्धा चमचा मध टाकून प्यावे. असे दिवसातून ३ वेळा करावे.