Low BP Ayurvedic Remedies: अचानक रक्तदाब कमी झाला तर काय करावे?

पुढारी वृत्तसेवा

अचानक चक्कर येणे, अशक्तपणा जाणवणे किंवा डोळ्यांसमोर अंधारी येणे ही कमी रक्तदाबाची लक्षणे असू शकतात.

अचानक रक्तदाब कमी झाला तर घाबरू नका, स्वयंपाकघरातील काही गोष्टी यात गुणकारी ठरतात.

1) 100 ग्रॅम मनुके 200 ग्रॅम पाण्यात रात्रभर भिजवावी.

सकाळी एक-एक मनुके नीट चावून खा. यामुळे रक्तदाब सामान्य होण्यास मदत होते.

२) जर लो बीपीमुळे चक्कर किंवा मूर्छा (fainting) आली असेल, तर आवळ्याचा रस आणि मध समप्रमाणात मिसळा.

हे मिश्रण २-२ चमचे थोड्या अंतराने दिल्यास रुग्ण शुद्धीवर येतो.

3) ताकात दोन ग्रॅम हींग मिसळून ताक घेतल्याने लो ब्डलप्रेशर सामान्य होते. दुपारी जेवणानंतर ताक घेणे अति उत्तम.

4) गाजराच्या रसात मध घालून घेतल्यास पण फायदा होतो. गाजराचा मोरंबा पण फायदेकारक असतो.