Joint Pain: सांधेदुखीचा त्रास होतोय? हे ४ आयुर्वेदिक उपाय ठरतील फायदेशीर

पुढारी वृत्तसेवा

१) या आजाराच्या सुरुवातीला पायाच्या टाचा, गुडघे आणि हाताची बोटे यांमध्ये वेदना होणे, सुई टोचल्याप्रमाणे दुखणे किंवा जळजळ होणे असे अनुभव येतात.

अशी लक्षणे दिसल्याबरोबर सर्वप्रथम पोट साफ ठेवणे आणि अपचन होऊ न देणे, यावर उपाय करावा.

२) अश्वगंधा चांगली बारीक कुटून तिचे चूर्ण तयार करावे. यात समप्रमाणात पिठीसाखर मिसळावी आणि हे मिश्रण तीन वेळा वस्त्रगाळ करून बाटलीत भरून ठेवावे.

सकाळ-संध्याकाळ १-१ चमचा (५ ते १० ग्रॅम) फक्की मारून वरून गरम दूध प्यावे. हा उपाय अत्यंत फायदेशीर आहे.

३) ओवा, शुद्ध गुग्गुळ, मालकांगणी आणि काळे दाणे या चौघांना स्वतंत्रपणे कुटून त्यांचे चूर्ण करावे.

त्यानंतर हे चूर्ण समप्रमाणात घेऊन एकत्र करावे. त्यात थोडे पाणी शिंपडून वाटाण्याएवढ्या गोळ्या तयार कराव्या. २-२ गोळ्या दिवसातून तीन वेळा गरम दुधासोबत घ्याव्या.

४) लसणाच्या रसात कापूर मिसळून त्याने मालिश केल्यास संधिवाताचे दुखणे कमी होण्यास मदत होते.

garlic Side effects

हे उपाय 'घरचा वैद्य' या पुस्तकातील आहेत. रूग्णांनी तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक.

Nosebleed Ayurvedic Remedies | file photo