पुढारी वृत्तसेवा
1) खसखस आणि टरबुजाच्या बियांचा गर वेग-वेगळे वाटून समप्रमाणात मिसळून ठेवावे. सकाळ संध्याकाळ रिकाम्या पोटी खाल्याने वाढलेला रक्तदाब कमी होतो व रात्री झोप सुद्धा चांगली लागते.
2) एक चमचा मेथीच्या दाण्याचे चूर्ण सकाळ संध्याकाळ रिकाम्या पोटी घेतल्यास (आठवडाभर) उच्च रक्तदाब कमी होतो.
3) मनुका सोबत लसणाची पाकळी खाल्याने आराम मिळतो.
4) फांदीवर पिकलेली पपई तीस दिवस सकाळी रिकाम्यापोटी खावे, त्यानंतर 2 तास काही खाउ-पिऊ नये.
5) गहू व चणे समप्रमाणात घेऊन दळून घ्यावे. या पीठाच्या पोळ्या खाव्या. एका आठवड्यात आराम येतो.
6) रात्री एका तांब्याच्या भांड्यात पाणी भरून ठेवावे. सकाळी उठून ते पाणी प्यावे. त्याने उच्च रक्तदाब सामान्य होतो.
7) तुळशीची चार पाने, लिंबाची दोन पाने, दोन चमचे पाणी घेऊन एकत्र वाटावी. रिकाम्यापोटी घेतल्याने उच्च रक्तदाबात आराम येतो.
'घरचा वैद्य' या पुस्तकात उच्च रक्तदाबासाठी हे आयुर्वेदिक उपाय दिले आहेत. तज्ञांचा सल्ला महत्वाचा