Headache Ayurvedic Remedies: सर्व प्रकारच्या डोकेदुखीवर आयुर्वेदातील सोपे उपाय

पुढारी वृत्तसेवा

डोकेदुखीची अनेक कारणे असू शकतात. उदा. बद्धकोष्ठता, पोटात गॅस होणे, उच्च रक्तदाब, दृष्टी कमकुवत होणे, अपुरी झोप, अतिश्रम किंवा अशक्तपणा इत्यादी.

साधारण डोकेदुखी असल्यास हे उपाय फायदेशीर ठरतात

१. एका बत्ताशावर अमृतधाराचे ४ थेंब टाकून तो खावा. तसेच, रुमालावर २ थेंब अमृतधारा शिंपडून त्याचा वास घेतल्यास आराम मिळतो.

२. लिंबाच्या पानांचा रस नाकपुड्यांमध्ये सोडल्याने डोकेदुखी थांबण्यास मदत होते.

३. चंदन पाण्यात उगाळून त्याचा कपाळावर लेप लावल्यास, उष्णतेमुळे होणारी डोकेदुखी थांबते.

४. २५० मि.ली. तिळाचे तेल, १० मि.ली. चंदनाचे तेल, १० मि.ली. दालचिनीचे तेल आणि थोडे भीमसेनी कापूर एकत्र करून एका बाटलीत भरून ठेवावे. हे तेल डोक्याला लावल्यास डोकेदुखीत त्वरित आराम मिळतो.

५. दोन चमचे आवळ्याच्या चूर्णात एक चमचा शुद्ध तूप मिसळून त्याचे सेवन करावे आणि वरून एक पेला कोमट दूध प्यावे.

६. रोज सकाळी रिकाम्या पोटी एक सफरचंद कापून, त्याला थोडे मीठ लावून नीट चावून खावे. हा प्रयोग सलग १० दिवस केल्यास जुनी डोकेदुखी दूर होण्यास मदत होते.