Body Pain | ‘सतत अंग दुखतंय’ हा घरगुती काढा सात दिवस घ्या व फरक बघा!

पुढारी वृत्तसेवा

सध्या पावसाळा सुरु आहे त्‍यामुळे सतत अंगदुखी किंवा आळस अंगात असतो, याला पावसाळी वातावरणामुळे शरिरात वातदोष वाढलेला असणे

वात वाढला असल्याने सतत शरीरात अंग दुखी असते, कधी पाठ, कंबर, तळवे, मान, हात असे शरीराचे वेगवेळे भाग नेहमी दुखत असल्यचे आपल्या लक्षात येईल

यासाठी एक सोपा उपाय म्हणजे घरात सहज उपलब्ध असणारे सुंठ, अळशी, जिरे, ओवा याचा काढा घेणे रोज सकाळी हा काढा घेतल्यास तुम्हाला आठवडाभरात फरक जाणवेल

जिरे शरीरात वाढलेली उष्णता कमी करुन गुड सोर्स ऑफ एनर्जी तयार करते, यामुळे तुमची अंगदुखी कमी होण्यास मदत होते

दुसरा पदार्थ म्हणजे बहुगुणी ओवा- ओवा हा शरीरात अग्निदिपन करतो तसेच शरिरात असलेल्या कृमी मारतो

सुंठ ही प्राकृतिकपणे आमवात दूर करते, आमवातामुळे सांधे दुखतात किंवा सांध्यामध्ये सूज येते पावसाळ्यात हा त्रास खूप होतो, सुंठीच्या औषधी गुणांमुळे अंगदुखी कमी होण्यास मदत होते

अळशी किंवा जवस हे अशा बिया आहेत ज्यामध्ये हाय इन ओमगा ॲसिड असतात हे शरीरातील स्टिफनेस पूर्ण कमी असते. परिणामी अंगदुखी कमी होत जाते

हा काढा तयार करता एक एक चमचा ओवा व जिरे घ्यायचे आहेत. तर अर्धा चमचा अळशी व चिमुटभर सुंठ पावडर घ्यायची आहे या सर्वांचा काढा तयार करायचा आहे.

तसेच अंगदुखी कमी करण्यासाठी शरीरात एन्डॉर्फिन नावाचे रसायन स्त्रवने खूप महत्‍वाचे आहे यासाठी योगासनांचा खूप फायदा होतो.