पुढारी वृत्तसेवा
डागमुक्त आणि तजेलदार त्वचा हवी असेल तर हे आयुर्वेदिक उपाय नक्की करून पहा. यामुळे तुमचे डाग आणि सुरकुत्या दूर होण्यास मदत होईल.
१) जर तुम्हाला मुरूम किंवा पडलेल्या डागांचा त्रास असेल, तर हा उपाय सर्वोत्तम आहे.
उकडलेला बटाटा सालासकट वाटून घ्या. त्यात काकडीचा रस आणि थोडा लिंबाचा रस मिसळा.
हा लेप चेहऱ्यावर लावून १ तासाने चेहरा धुवा. तासाभराने धूवून टाकावा. काही दिवस हा उपाय केल्याने डाग नाहिसे होतील.
२) चेहऱ्यावरील काळेपणा दूर करण्यासाठी एक चमचा व्हिनेगरमध्ये अंड्याचा पांढरा बलक आणि पिकलेले केळ चांगल्याप्रकारे मिसळावे.
या पेस्टला चेहऱ्यावर १५ मिनिटे लावून ठेवावे नंतर कोमट पाण्याने धुवून टाकावे. आठवड्यातून दोन वेळा हा प्रयोग करावा.
३) पिकलेल्या पपईचा तुकडा कापून चेहऱ्यावर रगडावा. दहा मिनिटांनी चेहरा धूवून टाकावा. थोड्याच दिवसात चेहरा उजळून चेहऱ्यावरचे डाग, सुरकुत्या नाहिशा होतील.