Ayurvedic Remedies: हे ७ आयुर्वेदिक उपाय माहीत आहेत का? संकटकाळात येतील कामाला

पुढारी वृत्तसेवा

उलट्या थांबवण्यासाठी

जर अचानक उलट्यांचा त्रास सुरू झाला, तर २-३ लवंगा पाण्यात उकळून घ्या आणि ते पाणी हळूहळू प्या. लवंगामध्ये पोटातील स्नायूंना शांत करण्याचे गुणधर्म असतात.

पोटदुखीवर उपाय

ओवा आणि चिमूटभर मीठ एकत्र करून चावून खा.

पोटदुखीपासून त्वरित आराम मिळेल.

चक्कर येणे किंवा उष्माघात

उन्हामुळे किंवा अचानक चक्कर आल्यास बडीशेप आणि खडीसाखर एकत्र करून खा.

छातीत कफ जमा होणे

छातीत कफ जमा होऊन श्वास घेण्यास त्रास होत असल्यास, कोमट पाण्यात चिमूटभर हिंग विरघळवून ते प्या.

दातदुखी

दातांत तीव्र वेदना होत असल्यास आल्याचा रस कोमट करून कापसाच्या बोळ्याने दुखणाऱ्या दातावर लावा.

Ginger | File Photo

जखम झाल्यावर

कापले किंवा छोटी जखम झाली असेल तर हळद आणि तीळ तेल एकत्र गरम करून त्याची पेस्ट जखमेवर लावा.

Turmeric side effects

कानदुखी

कानात वेदना होत असतील तर लसूण टाकून कोमट केलेल्या तेलाचे थेंब कानात टाका.

Garlic