Bitter Cumin Benefits: कडू जिऱ्याचे फायदे माहिती आहेत का?

पुढारी वृत्तसेवा

कडू जिरे हे अत्यंत कडू चवीचे औषधी बी आहे. हे स्वयंपाकात वापरले जाणारे सामान्य जिरे, किंवा शहाजिरे यांपेक्षा वेगळे आहे. Centratherum anthelminticum असे त्याचे शास्त्रीय नाव आहे. आयुर्वेदात याला 'अरण्य जीरक' असेही म्हणतात.

पांढरे कोड : कडू जिरे, हरताळ, त्रिफळा समभाग घेऊन गोमूत्रात वाटून लेप करावा. कडू जिरे, त्रिफळा, स्वैरसाल, वावडिंग व उपलसरी समभाग घेऊन त्याचा काढा करून घ्यावा. (जाणकाराच्या मार्गदर्शनाखाली हे औषध घ्यावे.)

हे औषधी समभाग घेऊन वाटून त्याचा कोडावर लेप करावा. (कोडाच्या लेप लावलेल्या जागेवर फोड आल्यास त्यावर 'तूवरक तेल' लावावे.)

जंत : आर्धा ग्रॅम कडू जिरे व खडीसाखर याचा काढा करून घ्यावा. त्यानंतर दुसऱ्या दिवशी रेचक घ्यावे. कारण जंत मरत नाहीत तर मूर्च्छित होतात.

सुकी खरुज व कंड: कडू जिरे गोमुत्रात वाटून लेप करावा.

मुलांना कफ पडण्यासाठी: आर्धा ग्रॅम कडूजिरे वाटून मधातून चाटण करून द्यावे.

मुलांचा ताप व खोकला: आर्धा ग्रॅम कडू जिरे वाटून त्यात खडीसाखर घालून द्यावे.

गर्भवती महिला, स्तनपान करणाऱ्या माता आणि यकृत किंवा मूत्रपिंडाचे विकार असलेल्या व्यक्तींनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय याचे सेवन करू नये.

Pregnant women | file photo

विजय रणदिवे यांच्या 'नैसर्गिक औषधे आणि घरगुती उपाय' या पुस्तकात हे उपाय सांगितले आहेत. कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.

ayurvedic | file photo