Ayurvedic drinks for Sleep: रात्री शांत झोप लागण्यासाठी ३ आयुर्वेदिक उपाय

पुढारी वृत्तसेवा

डॉक्टरांच्या मते, निरोगी राहण्यासाठी किमान ८ तासांची झोप आवश्यक असते; मात्र अनेकदा आपण झोपण्याचा प्रयत्न करण्यातच जास्त वेळ घालवतो.

या समस्येवर 'आयुर्वेदा'ने काही प्रभावी उपाय सुचवले आहेत. नैसर्गिक घटकांपासून बनवलेली ही तीन पेये तुम्हाला शांत आणि गाढ झोप मिळवून देण्यास मदत करतील.

१. मून ड्रिंक: तणावापासून मुक्ती

हे एक पारंपारिक आयुर्वेदिक पेय असून ते अश्वगंधा, दूध, वेलची आणि दालचिनी यांच्या मिश्रणाने तयार केले जाते.

कसे बनवाल?

१ कप दूध गरम करा. त्यात १ चमचा अश्वगंधा पावडर (किंवा १ गोळी बारीक करून), अर्धा चमचा वेलची पूड आणि अर्धा चमचा दालचिनी पावडर मिसळा. तुमचे 'मून ड्रिंक' तयार आहे.

२. हळदीचे दूध: मनाच्या शांततेसाठी

हळद, जायफळ आणि केशर घालून बनवलेले हे पेय आरोग्यासाठी वरदान मानले जाते.

कसे बनवाल?

१ कप दूध गरम करून त्यात १ चमचा हळद, अर्धा चमचा जायफळ पूड आणि चिमूटभर केशर मिसळा.

३. ज्येष्ठमध: नसांच्या आरामासाठी

ज्येष्ठमध हे केवळ घशासाठीच नाही, तर झोपेसाठीही उत्तम औषध आहे. आयुर्वेदानुसार ज्येष्ठमध पचन आणि श्वसनाच्या तक्रारींवरही गुणकारी आहे.

कसे बनवाल?

१ कप थंड दुधात १ चमचा ज्येष्ठमध पावडर किंवा १ गोळी बारीक करून मिसळा. झोपेची गुणवत्ता सुधारण्यासाठी हे पेय सकाळी रिकाम्या पोटी घेणे अधिक फायदेशीर ठरते.