पुढारी वृत्तसेवा
सलमान खानचा भाचा अयान अग्निहोत्रीने नवीन वर्षाच्या सुरुवातीला चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे. अयानने त्याची गर्लफ्रेंड टीना रिझवानी सोबत साखरपुडा केला आहे.
अयानच्या पोस्टनंतर सोशल मीडियावर टीना रिझवानीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. टीना ही मूळची मुंबईची असून ती एक यशस्वी कॉर्पोरेट प्रोफेशनल आहे.
टीना रिझवानी ही बिझनेस मॅनेजमेंट आणि मार्केटिंग क्षेत्रातील तज्ज्ञ आहे. गेल्या १० वर्षांपासून ती या क्षेत्रात सक्रियपणे काम करत आहे.
विशेष म्हणजे टीना ही अयानच्याच 'ब्लू ॲडव्हायझरी' या कंपनीत काम करते. ती या कंपनीत 'हेड ऑफ कम्युनिकेशन' या उच्च पदावर कार्यरत आहे.
टीनाने मुंबईच्या नामांकित जय हिंद कॉलेजमधून मास कम्युनिकेशनचे शिक्षण घेतले आहे. विशेष म्हणजे कॉलेजमध्ये असतानाच तिने कामाला सुरुवात केली होती.
अयान आणि टीना गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. कुटुंबाच्या संमतीने आता त्यांनी आपल्या नात्याला अधिकृत स्वरूप दिले आहे.
साखरपुड्याची बातमी समजताच मलायका अरोरा, सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल यांसारख्या कलाकारांनी या जोडीवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
अयान हा सलमानची बहीण अलविरा खान अग्निहोत्री आणि चित्रपट निर्माता अतुल अग्निहोत्री यांचा मुलगा आहे.