पावसाळ्यात 'या' भाज्या खाणं टाळा, नाहीतर..

पुढारी वृत्तसेवा

पालक-मोहरीची भाजी खाताना सावधान!

पालक, मेथी, मोहरी यांसारख्या पालेभाज्यांमध्ये माती, छोटे कीटक आणि बॅक्टेरिया लपलेले असू शकतात. त्यामुळे त्या स्वच्छ धुऊन आणि नीट शिजवूनच खा.

पावसाळ्यात वांगी ठरू शकते धोकादायक!

पावसाळ्यात वांग्यामध्ये किडे लागण्याची शक्यता वाढते. बाहेरून ताजे दिसणारे वांगे आतून खराब असू शकते, त्यामुळे खरेदीपूर्वी ते नीट तपासा.

कोबीच्या पानांमध्ये लपलेले असतात कीटक!

कोबीच्या अनेक थरांमध्ये पावसाळ्यात छोटे कीटक, अंडी आणि घाण साचू शकते. त्यामुळे कोबीचे थर वेगळे करून स्वच्छ धुऊन मगच वापरा.

फुलकोबी घेताना 'ही' काळजी घ्या!

फुलकोबीच्या फुलांमध्ये कीटक आणि घाण अडकण्याची शक्यता असते. स्वयंपाक करण्यापूर्वी ती स्वच्छ धुऊन किंवा मिठाच्या पाण्यात भिजवून घ्या.

मशरूम खात असाल तर ताजेपणा तपासा!

मशरूममध्ये नैसर्गिकरित्या जास्त ओलावा असतो आणि पावसाळ्यात ते लवकर खराब होऊ शकतात. त्यामुळे ताजे मशरूमच खरेदी करा आणि योग्य पद्धतीने साठवा.

मग पावसाळ्यात कोणती भाजी खावी?

पावसाळ्यात ताज्या, स्वच्छ आणि सहज पचणाऱ्या भाज्यांना प्राधान्य द्या. भाजी खरेदी करताना तिचा रंग, वास आणि ताजेपणा नक्की तपासा.

दुधी भोपळा ठरेल उत्तम पर्याय!

दुधी भोपळा हलका आणि सहज पचणारा असल्याने पावसाळ्यात आहारात समाविष्ट करता येतो. मात्र दुधी भोपळा कडू नाही ना, हे तपासूनच वापरा.

भाज्या खाण्यापूर्वी 'ही' गोष्ट विसरू नका!

पावसाळ्यात कोणतीही भाजी कच्ची किंवा अर्धवट शिजवून खाण्याऐवजी ती व्यवस्थित स्वच्छ करून आणि पूर्णपणे शिजवून खाणे अधिक सुरक्षित ठरते.