लहान गुंतवणूक, मोठा फायदा! फक्त २१० रुपये भरा आणि मिळवा आयुष्यभर पेन्शन; केंद्र सरकारची योजना

मोहन कारंडे

आजच्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या जीवनात प्रत्येकाला आपले भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित असावे असे वाटते. 

Atal Pension Yojana | Atal Pension Yojana

अनेकजण वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करून आपला वृद्धापकाळ सुखाचा करण्याचा प्रयत्न करतात. याच विचारातून केंद्र सरकारने एक महत्त्वाची योजना सुरू केली आहे

Atal Pension Yojana | Atal Pension Yojana

जिचे नाव आहे 'अटल पेन्शन योजना' (Atal Pension Yojana).

Atal Pension Yojana | Atal Pension Yojana

या योजनेअंतर्गत पात्र नागरिकांना वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यावर दरमहा १ हजार ते ५ हजार रुपयांपर्यंत खात्रीशीर पेन्शन मिळते.

Atal Pension Yojana | Atal Pension Yojana

जर तुम्हालाही तुमचे भविष्य सुरक्षित करायचे असेल, तर तुम्ही या सरकारी योजनेत सहज अर्ज करू शकता. 

Atal Pension Yojana | Atal Pension Yojana

असंघटित क्षेत्रातील कामगारांनी या योजनेत गुंतवणूक केल्यास वयाच्या ६० वर्षांनंतर गुंतवणूकदाराला दरमहा १ हजार पासून ५ हजार पर्यंत पेन्शन मिळते.

Atal Pension Yojana | Atal Pension Yojana

योजनेसाठी अर्ज कसा करावा?

स्टेप १: ज्या बँकेत तुमचे बचत खाते आहे. तिथे या योजनेची माहिती देणाऱ्या संबंधित अधिकाऱ्याशी संपर्क साधा.

Atal Pension Yojana

स्टेप २: यानंतर अधिकारी तुमची केवायसी (KYC) प्रक्रिया पूर्ण करतील. त्यानंतर तुम्हाला योजनेचा पेन्शन प्लॅन निवडण्यास सांगितले जाईल.

Atal Pension Yojana

स्टेप ३: तुम्ही निवडलेला पेन्शन प्लॅन तुमच्या बँक खात्याशी जोडला जाईल. त्यानंतर तुमच्या वयानुसार आणि निवडलेल्या पेन्शननुसार निश्चित झालेला हप्ता दरमहा तुमच्या बँक खात्यातून आपोआप कापला जाईल.

Atal Pension Yojana

अटल पेन्शन योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ६० वर्षांनंतर मिळणारी निश्चित मासिक पेन्शन.

Atal Pension Yojana

तुम्ही जेवढ्या कमी वयात या योजनेत गुंतवणूक सुरू कराल, तेवढा कमी हप्ता तुम्हाला भरावा लागेल.

Atal Pension Yojana

उदाहरणार्थ, जर तुम्ही वयाच्या १८ व्या वर्षी ५ हजार रुपये मासिक पेन्शनचा प्लॅन निवडला, तर तुम्हाला दरमहा फक्त २१० रुपये भरावे लागतील. हेच जर तुम्ही वयाच्या ४० व्या वर्षी सुरू केले, तर हप्त्याची रक्कम जास्त असेल.

या योजनेत १८ ते ४० वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक गुंतवणूक करू शकतो. 

Atal Pension Yojana