Caffeine limit for kids: लहान मुलांना किती वर्षापर्यंत चहा-कॉफी देऊ नये?

Anirudha Sankpal

चहा आणि कॉफीमध्ये 'कॅफीन' हा उत्तेजक घटक असतो, जो प्रौढांसाठी ठराविक प्रमाणात सुरक्षित असला तरी मुलांसाठी अत्यंत हानिकारक आहे.

मज्जासंस्थेवर परिणाम

कॅफीनमुळे मुलांची मज्जासंस्था उत्तेजित होते, ज्यामुळे त्यांच्या हृदयाचे ठोके आणि श्वसनाचा वेग अनियंत्रितपणे वाढू शकतो.

झोप आणि थकवा

चहा-कॉफीमुळे तात्पुरती ऊर्जा मिळत असली, तरी त्यानंतर मुलांना प्रचंड थकवा, अस्वस्थता आणि निद्रानाशाचा त्रास होतो.

साखरेचे दुष्परिणाम

या पेयांमध्ये असलेली साखर रक्तातील साखर झपाट्याने वाढवते, ज्यामुळे मुले गरजेपेक्षा जास्त सक्रिय होतात आणि नंतर त्यांना अशक्तपणा जाणवतो.

भूक मंदावणे

साखर आणि कॅफीनच्या प्रभावामुळे मुलांच्या खाण्याच्या सवयी बिघडतात आणि त्यांना पुन्हा पुन्हा भूक लागते किंवा पौष्टिक अन्नावरची ओढ कमी होते.

वयोमर्यादा

'अमेरिकन अकॅडमी ऑफ पिडियाट्रिक्स'नुसार, १२ वर्षांपर्यंतच्या मुलांना कॅफीनयुक्त पदार्थ किंवा पेये अजिबात देऊ नयेत.

प्रौढांसाठी मर्यादा

मोठ्या माणसांनीही दिवसाला ४०० मिलीग्रामपेक्षा जास्त कॅफीन घेऊ नये, अन्यथा त्याचे आरोग्यावर विपरीत परिणाम होतात.

आरोग्यदायी पर्याय

चहा-कॉफीऐवजी मुलांना पाणी, दूध, ताक, शहाळ्याचे पाणी किंवा घरी बनवलेले फळांचे ताजे रस देणे उत्तम ठरते.

पोषक घटक

नैसर्गिक पेयांतून मुलांना हायड्रेशनसोबतच वाढीसाठी आवश्यक असणारी जीवनसत्त्वे आणि खनिजे मिळतात.

येथे क्लिक करा