Chanting Beads |जपमाळेत १०८ चं मणी का? विश्वाशी जोडणारी खगोलशास्त्रीय कारणे, जप केल्यास हे फायदे

Namdev Gharal

जपमाळेत १०८ मणी असण्यामागे आध्यात्मिक, वैज्ञानिक आणि खगोलशास्त्रीय अशी विविध कारणे आहेत. हिंदू धर्मात १०८ या अंकाला अत्यंत पवित्र मानले जाते.

जपमाळेत १०८ मणी असण्याची कारणे खगोलशास्त्र (Astronomy): सूर्य आणि पृथ्वीमधील अंतर हे सूर्याच्या व्यासाच्या (Diameter) १०८ पट आहे.

तसेच, पृथ्वी आणि चंद्रामधील अंतर हे चंद्राच्या व्यासाच्या १०८ पट आहे. त्यामुळे विश्वाशी जोडले जाण्यासाठी हा अंक महत्त्वपूर्ण मानला जातो.

भारतीय ज्योतिषशास्त्रानुसार २७ नक्षत्रे आहेत आणि प्रत्येक नक्षत्राचे ४ चरण असतात 27 *4= 108. तसेच १२ राशी आणि ९ ग्रह यांचा गुणाकारही १०८ येतो

मानवी शरीरात एकूण १०८ नाड्या हृदयचक्राशी जोडलेल्या असतात असे मानले जाते. जपाद्वारे या ऊर्जा केंद्रांचे संतुलन राखण्यास मदत होते.

१ हा अंक 'परमात्मा' किंवा 'एकता' दर्शवतो, ० हा 'शून्यता' किंवा 'पूर्णत्व' दर्शवतो आणि ८ हा 'अनंत' दर्शवतो.

एकाग्रता वाढते: माळेचा वापर करून जप केल्याने मनाची चंचलता कमी होते आणि लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढते.

जप करताना होणारी कंपने मज्जासंस्थेला शांत करतात, ज्यामुळे चिंता आणि मानसिक ताण कमी होतो.

शिस्त आणि संयम: माळेवरील मणी ओढण्याच्या प्रक्रियेमुळे मनाला एक प्रकारची शिस्त लागते आणि संयम वाढतो.

उच्च रक्तदाबावर नियंत्रण: संथ गतीने आणि लयबद्ध पद्धतीने जप केल्याने श्वसनाची गती सुधारते, ज्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते.

नकारात्मक विचारांचा नाश: जपाच्या सातत्यामुळे मनात येणारे वाईट किंवा अनावश्यक विचार दूर होऊन सकारात्मकता वाढते.