लाफिंग बुद्धा घरात ठेवतांय, ‘या’ ९ गोष्टी विसरू नका..

पुढारी वृत्तसेवा

दोन्ही हात वर असलेला बुद्धा

आर्थिक अडचणी आणि पैशांशी संबंधित अडथळे दूर करण्यासाठी हा प्रकार शुभ मानला जातो. सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी तो उपयुक्त असल्याचे मानले जाते.

मुलांसोबतचा लाफिंग बुद्धा

मुलांसोबत असलेली लाफिंग बुद्धाची मूर्ती घरातील आनंद आणि कौटुंबिक सौहार्दाचे प्रतीक मानली जाते. घरातील वातावरण प्रसन्न ठेवण्यासाठी हा प्रकार शुभ मानतात.

नाण्यांवर बसलेला लाफिंग बुद्धा

धनवृद्धी आणि आर्थिक स्थैर्याशी हा प्रकार जोडला जातो. तो तिजोरी, कॅश बॉक्स किंवा गल्ल्याजवळ ठेवण्याची फेंगशुईमध्ये मान्यता आहे.

लाफिंग बुद्धा कुठे ठेवावा?

मूर्ती कधीही जमिनीवर ठेवू नये. ती स्वच्छ आणि थोड्या उंच जागेवर ठेवावी. बेडरूम, बाथरूम आणि स्वयंपाकघरात ठेवणे टाळावे.

मुख्य दरवाजाजवळ ठेवण्याची पद्धत

घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ लाफिंग बुद्धा ठेवण्याची पद्धत आहे. मूर्तीचे तोंड घराच्या आतील दिशेला असावे, असे फेंगशुईमध्ये मानले जाते.

ड्रॉइंग रूम आणि ऑफिससाठी जागा

ड्रॉइंग रूममध्ये योग्य दिशेला आणि ऑफिसमध्ये पैसे ठेवण्याच्या जागेजवळ किंवा उत्तर दिशेला लाफिंग बुद्धा ठेवण्याची मान्यता आहे.

पोटावर हात फिरवण्याची मान्यता

काही मान्यतांनुसार सकाळी लाफिंग बुद्धाच्या पोटावर प्रेमाने हात फिरवून मनोकामना व्यक्त केली जाते. यामुळे सकारात्मक विचार आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते, असे मानले जाते.

मूर्तीची स्वच्छता आणि काळजी

लाफिंग बुद्धाची मूर्ती नेहमी स्वच्छ ठेवावी. मूर्ती तुटल्यास ती घरात ठेवू नये, अशी मान्यता आहे. मात्र विसर्जन करताना स्थानिक पर्यावरणीय नियमांचे पालन करणे योग्य आहे.

पोटलीवाला लाफिंग बुद्धा

खांद्यावर पोटली असलेला लाफिंग बुद्धा फेंगशुईनुसार शुभ मानला जातो. तो घरात सुख-समृद्धी आणि सकारात्मकता आणणारा मानला जातो.