पुढारी वृत्तसेवा
दम्याच्या रुग्णांनी केळी खावीत का, हा एक नेहमी विचारला जाणारा प्रश्न आहे.
काही जणांच्या मते केळी कफ वाढवतात, ज्यामुळे श्वसनाचा त्रास होऊ शकतो.
मात्र, केळीतील पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स फुफ्फुसांच्या कार्यासाठी उपयुक्त ठरतात.
जर केळी खाल्ल्यावर लगेच श्वास घेण्यास त्रास होत असेल, तर ती टाळावीत.
फ्रीजमधील थंड केळी खाणे दम्याच्या रुग्णांसाठी हानिकारक ठरू शकते.
केळी नेहमी दिवसा खावीत, रात्री खाणे टाळावे.
व्यक्तीच्या प्रकृतीनुसार केळीचा परिणाम बदलू शकतो.
कोणताही बदल करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.