Asil Chicken | झुंजीसाठी वापरला जाणारा शक्तीशाली अस्सल कोंबडा!

Namdev Gharal

असील कोंबडा (Asil Chicken) ही जगातील सर्वात जुनी आणि शक्तिशाली कोंबड्यांच्या जातींपैकी एक मानली जाते.

'असील' Asil या शब्दाचा अर्थ 'अस्सल' किंवा 'शुद्ध' असा होतो. ही जात प्रामुख्याने तिच्या लढाऊ वृत्तीसाठी दणकट शरीरयष्टीसाठी ओळखली जाते.

असील जातीचा उगम भारत (प्रामुख्याने आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि उत्तर प्रदेश) आणि पाकिस्तान मधील आहे.

ही जात हजारो वर्षांपासून अस्तित्वात असून प्राचीन काळात राजे-महाराजे या कोंबड्यांचा वापर कोंबड्यांच्या झुंजी साठी करत असत.

यांचा आकार अतिशय मोठा, मांसल आणि खांदे रुंद असतात. यांची उभी राहण्याची पद्धत अतिशय रुबाबदार असते.

यांचा चेहरा लांबट, डोळे खोलवर गेलेले आणि चोच अत्यंत मजबूत व वळलेली टोकदार असते.

असील कोंबड्यांना सहसा Pea Comb या प्रकारचा तुरा असतो, जो आकाराने लहान असतो.

यांचे पाय लांब, जाड आणि पिवळ्या रंगाचे असतात. नखांमध्ये खूप ताकद असते. प्रतिद्वंद्वीला रक्तबंबाळ करण्याची क्षमता असणारी नखे असतात

नराचे वजन साधारणपणे ३ ते ५ किलो पर्यंत असते, तर मादीचे वजन २ ते ३ किलो असते. (प्रकारानुसार यात फरक असू शकतो).

हे कोंबडे स्वभावतः खूप आक्रमक आणि धाडसी असतात. ते शेवटपर्यंत माघार घेत नाहीत. त्‍यामुळे प्रामुख्याने झुंजीसाठी याचा वापर केला जातो.