Asia Largest Bus Stand : बसेसचा महासागर... या शहरात आहे आशियातील सर्वात मोठे बसस्थानक

पुढारी वृत्तसेवा

दिल्ली किंवा मुंबईत नाही तर भारताचे सर्वात मोठे बसस्थानक तामिळनाडूची राजधानी चेन्नई येथे आहे.

कोयम्बेडू परिसरात असलेले हे बसस्थानक केवळ भारताचेच नाही तर संपूर्ण आशियातील सर्वात मोठे बसस्थानक मानले जाते.

हे बसस्थानक सुमारे 37 एकर परिसरात पसरलेले आहे.

येथे एकाच वेळी 180 बसेस उभ्या राहू शकतात आणि दररोज सुमारे दोन हजार बसेसची ये-जा होते.

2018 मध्ये याला तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. जी. रामचंद्रन यांच्या स्मरणार्थ पुरैची थलाइवर डॉ. एमजीआर बसस्थानक असे नाव देण्यात आले.

येथे तीन हजार दुचाकी आणि 60 अतिरिक्त बसेससाठी स्वतंत्र पार्किंगची सोय आहे.

2002 मध्ये साधारण 103 कोटी रुपये खर्चून बांधलेले हे स्थानक चेन्नईतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मैलाचा दगड ठरले आहे.

याच्या अफाट विस्तारामुळे याला बसेसचा समुद्र असेही म्हटले जाते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.